Tuesday, February 17, 2026
Homeवणी50 वर्षीय महिलेवर 4 नराधमांचा अत्याचार...

50 वर्षीय महिलेवर 4 नराधमांचा अत्याचार…

अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील राजूर गावात वास्तव्यास असलेल्या एका 50 वर्षीय महिलेवर 4 नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बुधवारी (दि.28 जून) रात्री नवरगाव शेतशिवारात ही घडली. याप्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच नव्याने रूजू झालेले ठाणेदार P.I अजित जाधव यांनी चक्रे फिरवीत 4 नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.

एका ५० वर्षाच्या वयस्क महिलेवर अत्याचार करण्यात या घटनेने संपुर्ण वणी तालुकाच हादरला आहे. या महिलेला राहत्या छोट्याश्या घरून उचलून नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न शहरात ऐरणीवर आला आहे. आरोपींनीm दारुची नशा करून तसेच महिलेलाही जबदस्ती दारू पाजून तिच्यावर लागोपाठ अत्याचार केला. महिलेला राजूर गावात परत जैसे थे चा स्थितीत सोडून निघून गेले. सकाळी महीलेनी पोलिस स्टेशन गाठत . तिने पोलिसांसमोर आपबिती कथन करीत 4 नराधमांनी अत्याचार केल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जलद तपासचक्रे फिरवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या 4 ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मनोज अजाबराव गाडगे (वय 47) रा. रामपुरा वार्ड, वैभव घनश्याम गेडाम (वय 22) रा. लालगुड़ा ,विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (वय 39)रा. टागोर चौक व कपिल याचा  समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम 354, 354 (À),(1),366 ,376 (D), 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments