अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९ में रोजी दुपारी तब्बेत अचानक बिघडली. त्यातच वणी येथील एका खाजगी रुग्णालयातून नागपूर ला रेफर करण्यात आले. रविवारी नागपूर येथे डोक्याची नस फाटल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतू नियतीला काही औरच मान्य होतें.21 में रोजी दुपारी मोहन चा दुःखद निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता मित्रपरिवारात शोककळा पसरली.Sudden “death” of Mohan Balaji Parodhi.
मोहन च्या पश्चात पत्नी, दिड वर्षाचा मुलगा, वृद्ध आईवडील आहेत.मोहन च्या जाण्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले.वणी येथील राहत्या घरून (विराणी टॉकीज जवळ) अंतिम यात्रा निघेल व मोक्षधाम वणी ( सतीघाट) येथे अंत्यसंस्कार मंगळवारला सायंकाळी ५ वाजता करण्यात येईल.