अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे संजय खाडे यांच्या वतीने करण्यात आली. उप-अभियंत्याच्या दालनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह संजय खाडे यांनी ठिय्या मांडून समस्यांचा डोंगर दाखवित शहरी व ग्रामीण भागांमध्ये परस्पररित्या विजेचा खेळखंडोबा होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम देखिल होत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला.त्यामुळे वीज दरवाढ त्वरित रद्द करावी व ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा कराअशी मागणी निवेदनातून करण्यात आली.Provide smooth power supply to customers by canceling electricity price hike.
अनेक भागांमध्ये कमी दाबाने वीज मिळत असल्यामुळे उद्योजकांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे त्या नागरिकांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही. दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागातही पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या पाणी योजना आहेत, त्या योजनांवर सुद्धा वेळोवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळेवर्षातून शंभर दिवसही पाणी मिळू शकत नाही.या वीजदरवाढीचा शेतकरी तसेच सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसणार आहे. महागाईने देखिल सर्वसामान्य होरपळला आहे. तसेच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे वीज दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना राजाभाऊ पाथ्रडकर, तेजराज बोढे, प्रमोद वासेकर, संजय सपाट, विकेश पानघाटे, धानोरकर,साधना गोहोकर, मंगला झिलपे, काजल शेख, अशोक चिकटे, कैलास पचारे, रवि कोटावार, अशोक नागभीडकर, अमित संते, अरुण लांडे, वामन कुचणकर, प्रतिक गेडाम, वामन नागपुरे, रामदास पखाले, सुरेश भारसाकळे, मालेकर, सुरेश बंसल, संगीता खाडे, बरखा वाधवानी, प्रेमिला पावडे, दर्शना पाटील, मंदा बांगरे, संगिता मांढरे, उज्ज्वला निब्रड, ललिता बरशेट्टीवार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.