माणिक कांबळे/मारेगाव :- साई मित्र परिवार मारेगावच्या वतीने महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
राष्ट्रीय शाळेत आयोजित या शिबिरात 106रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व बहाल केले.
वसंतराव नाईक शासकीय रक्तपेठी यवतमाळ यांच्या चमुनी हे रक्तपिशव्या गोळा केल्या सकाळी 11वाजेपासून सुरु झालेल्या या शिबिरात तालुक्यातील युवा वर्गानी मोठया संख्येने सहभाग घेतला.4वाजे पर्यंत रक्तदात्यांनी रक्त दान केले.
दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या शुभपर्वावावर साई मित्र परिवाराच्या वतीने महारक्तदान शिबीराचे आयोजन करीत असतात यंदा शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.