Ajay Kandewar,Wani :- तालुक्यातील वणीच्या शासकीय मैदानावर हजारो जनतेच्या प्रचंड उपस्थितीत शहरातील प्रभावी नेते ॲड. कुणाल चोरडिया व सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी ता.२६ नोव्हें.ला शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये दमदार, जंगी प्रवेश करून वणीच्या संपूर्ण राजकीय समीकरणात भूकंप घडवला.या जाहीर सभेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभल्याने कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.
कार्यक्रमात वातावरण घोषणांनी दणाणून गेले होते. ‘एकनाथ शिंदे… जिंदाबाद’, ‘शिंदे सेना… आगे बढो! अशा जयघोषाने मैदान अक्षरशः सळसळत होते.जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या बळकट नेतृत्वाखाली वणी नगरपालिका निवडणुकीकरिता शिंदे सेनेचे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यासाठी मोठी जाहीर सभा घेण्यात आली.या सभेत प्रभागनिहाय हजारोंचा जनसमुदाय आणि कार्यकर्त्यांची उसळलेली गर्दी पाहून शिंदे सेना शहरात जबरदस्त जोमात असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.कुणाल चोरडिया यांच्या प्रवेशानंतर वणीतील भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे.काही राजकीय तज्ज्ञांनी तर याला “भाजपाच्या नगरपरिषद निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का” असे संबोधले आहे.उमेश पोद्दार यांच्या समाजाभिमुख प्रतिमेमुळे आणि शहरातील चांगल्या संपर्क जाळ्यामुळे शिंदे सेनेची ताकद आणखी वाढेल, असा ही अंदाज व्यक्त केला जात आहे.

