Thursday, October 22, 2026
HomeBreaking Newsमोहदा गाव सुरक्षिततेकडे मोठी झेप.........

मोहदा गाव सुरक्षिततेकडे मोठी झेप………

Ajay Kandewar,Wani:- गावाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सरपंच वर्षा राजुरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांच्या नेतृत्वाखाली मोहदा ग्रामपंचायतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असे आधुनिक CCTV कॅमेरा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. गावाची वाढती लोकसंख्या, शाळा–अंगणवाडी परिसरातील गर्दी, तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांकडून या प्रकल्पाची मागणी केली जात होती.

या मागणीचा तत्परतेने विचार करून ग्रामपंचायतीने बस स्टॉप, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक चौक इत्यादी गावातील प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले आहेत.यामुळे गावातील सुरक्षाव्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ग्रामस्थ व विशेषतः बचत गटातील महिलांनी अनेकदा सुरक्षिततेसाठी तांत्रिक उपायाची मागणी केली होती. आज ती मागणी प्रत्यक्षात पूर्ण होत असल्याने महिलांनी सरपंच वर्षा राजुरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सरपंच वर्षा राजुरकर यांच्या सक्रिय कामकाजामुळे आणि उपसरपंच सचिन रासेकर यांच्या नियोजनबद्ध पाठपुराव्यामुळे मोहदा गावात काही महिन्यांत अनेक विकासकामांना गती मिळाल्याचे ग्रामस्थ सांगतात. CCTV प्रकल्प हा त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.गावाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा आहे. विकासकामांत सरपंच व उपसरपंचांची जोडी खरोखरच गावासाठी भाग्यवान ठरत आहे.”

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टी, निर्णयाचे स्वागत……

• गावात अनुशासन व शांतता वाढेल.

• गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसेल.

• मुला–मुलींच्या सुरक्षिततेला बळ मिळेल.

• सार्वजनिक ठिकाणी पारदर्शकता वाढेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page