Wednesday, April 15, 2026
HomeBreaking Newsश्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था’ची दमदार झेप.....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था’ची दमदार झेप…..

Ajay Kandewar,Wani – वणी शहरातील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वसामान्यांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे. संस्थेने यंदा तब्बल 3 कोटी 8लाख 33 हजार रु निव्वळ नफा मिळवत आर्थिक प्रगतीची दमदार झेप घेतली आहे. ‘वचनबद्धता, क्षमता आणि विश्वासार्हता’ या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत संस्थेने आपल्या सदस्यांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

संस्थेच्या आकडेवारीनुसार, ठेवींमध्ये मोठी वाढ झाली असून 2025 मधील 81,065.05 लाखांवरून 2026 मध्ये ती 89,132.45 लाखांवर पोहोचली आहे. तसेच कर्ज वितरणही वाढत 47,709.13 लाखांवरून 52,773.60 लाखांपर्यंत गेले आहे. एकूण व्यवसाय 1,28,774.18 लाखांवरून थेट 1,41,906.05 लाखांपर्यंत झेपावला आहे. तसेच वसूल भाग भांडवल 3,872.91 लाखांवरून 4,015.18 लाखांपर्यंत,राखीव निधी व इतर निधी 3,641.56 लाखांवरून 3,905.68 लाखांपर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे, खेळते भांडवल 91,846.52 लाखांवरून 1,00,333.71 लाखांपर्यंत पोहोचला आहे.

या सर्व आकडेवारीतून संस्थेची आर्थिक घोडदौड स्पष्ट दिसून येते.याशिवाय, वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि खेळते भांडवल या सर्वच घटकांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे 1000 कोटींकडे वाटचाल करत असलेली संस्था भविष्यात आणखी मोठ्या आर्थिक टप्प्यांकडे वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. सातत्याने ‘अ वर्ग’ ऑडिट मिळवणारी ही संस्था पारदर्शकता आणि शिस्तबद्ध कारभारामुळे नागरिकांच्या विश्वासाची खरी हक्कदार ठरत आहे.शेवटी, संस्थेच्या या यशामागे सदस्यांचा विश्वास आणि संचालक मंडळाची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली असून, येत्या काळातही अशाच प्रगतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वणीकरांसाठी ही संस्था आता केवळ पतसंस्था नसून विश्वासाचं मजबूत आर्थिक केंद्र बनली आहे.या यशाबद्दल अध्यक्ष ॲड देविदास काळे यांनी व्यवस्थापकीय संचालक संजय दोरखंडे, संचालक मंडळ, ग्राहक, ठेवीदार व सभासदांचे अभिनंदन केले.

कोट…..

अध्यक्ष ॲड.देविदास काळे यांनी सांगितले, “नक्कीच 2025-26 हे सहकार क्षेत्राला आव्हानात्मक असतानाही आम्ही ठेवी वाढीसोबतच नियमित कर्जफेड करणारे उत्कृष्ट कर्जदार निर्माण करण्यावर भर दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page