Wani -वणी शहरात यंदाची Dr. Babasaheb Ambedkar Jayanti मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणार असून Bhim Tiger Sena च्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे वणीकरांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे..
दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा Dr. Babasaheb Ambedkar Chowk येथे पार पडणार आहे. यानंतर रात्री ११.५० वाजता केक कापून Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीचे स्वागत करण्यात येणार आहे.तसेच दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता मानवंदना दिल्यानंतर बस स्टँड समोरील परिसरात धर्मभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता सर्वांचे भव्य स्वागत व सत्कार पुन्हा Dr. Babasaheb Ambedkar Chowk येथे करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमासाठी वणीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन भीम टायगर सेनेचे योगेश रायपूरे यांचाकडून करण्यात आले आहे.

