Thursday, April 30, 2026
Homeमुकुटबनवणीत 3 डिसें.ला"भव्य रोजगार मेळावा"......!

वणीत 3 डिसें.ला”भव्य रोजगार मेळावा”……!

•पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार.

•ना आमदार, ना खासदार तरीही राजू उंबरकर करताहेत युवकांसाठी एव्हढा विचार…….

अजय कंडेवार,वणी:-  नोकरीकरीता इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून “3 डिसेंबरला.भव्य रोजगार मेळावा” 2023 चे आयोजन  करण्यात येणार आहे अशी माहिती शिवमुद्रा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनसे नेते राजू उंबरकर यांनी सांगितले.तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहभाग घ्यावा,असे आवाहनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केले आहे.

देशातील 80 पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे. 5000 पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.सदर रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज भांदेवाडा येथे नारळ फोडून यांच्या चरणी दिनांक 21 सप्टेंबर पासून फॉर्म भरणे सुरुवात होत आहे. लगेच त्यानंतर उमेदवारांकरीता मुलाखत पूर्व प्रशिक्षणाची सुद्धा सुरुवात होणार आहेत. वणी मारेगाव व झरी तिन्ही तालुक्यामध्ये मुलाखत पूर्व प्रशिक्षण पार पाडल्यानंतर डिसेंबर महिन्यात 03 तारखेला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांना मुलाखत आणि लगेच नियुक्तीपत्र प्रदान करून देशातील नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मनसेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

उमेदवारांना सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार असून QR कोड द्वारा उमेदवाराना संपूर्ण नोंदणी फॉर्म भरता येणार आहे व रजिस्ट्रेशन लिंक वरून रोजगार मेळाव्या संदर्भात सविस्तर माहित प्राप्त होणार आहे.युवकांना मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता मुलाखत पूर्व प्रशिक्षणाची आवश्यकता असते त्यामध्ये मुलाखतीचे बारकावे , फॉर्म संदर्भात आवश्यक माहिती तसेच रोजगार मेळाव्यातील संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चमू द्वारा वणी मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यांतील 50 हून अधिक मुख्य गावात वेळापत्रकानुसार पार पाडण्यात येईल सदर वेळापत्रक सुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येत असून युवकांकरिता मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page