Sunday, May 31, 2026
HomeBreaking Newsवणीकरांचा अभिमान –संतोष डंभारे यांची निवड.

वणीकरांचा अभिमान –संतोष डंभारे यांची निवड.

•नव्या जबाबदारीकडे वाटचाल .

Ajay kandewar,Wani:- भारतीय जनता पक्षात संघटन हीच खरी ताकद मानली जाते. या संघटनात्मक बळाला अधिक धार देणारी जबाबदारी म्हणजे जिल्हा चिटणीस पद. आज ही प्रतिष्ठेची जबाबदारी वणी तालुक्याच्या सुपुत्रावर म्हणजेच संतोष डंभारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे, ही प्रत्येक वणीकरासाठी अभिमानाची बाब आहे.

पक्षनिष्ठा, कार्यतत्परता आणि साधेपणातून जिंकलेला जनतेचा विश्वास हे डंभारे यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची त्यांची वृत्ती, संघटन कौशल्य आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच आज त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविली गेली आहे.

ही निवड केवळ एका कार्यकर्त्याचा सन्मान नाही, तर वणी तालुक्यातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचा विजय आहे. डंभारे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास जिल्ह्यातील सर्व स्तरांवरून व्यक्त होत आहे.आज संतोष डंभारे यांची जिल्हा चिटणीसपदी झालेली निवड ही केवळ एका व्यक्तीची प्रगती नाही, तर पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्यशैलीचा सन्मान आहे.वणी तालुक्याला लाभलेला हा सन्मान आगामी काळात पक्ष संघटनाला निश्चितच नवी दिशा देईल, यात शंका नाही. येणाऱ्या काळात याही पेक्षा अधिक काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले. तसेच त्यांना ही संधी दिल्याने त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान,माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष रवि बेलुरकर यांचे आभार मानले आहेत.

🎉💐🎁🎁शुभेच्छा देणारे • यवतमाळ जिल्हा सरचिटणीस संतोष डंभारे 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page