Ajay,Wani : तालुक्यातील राजुर ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा प्रशासक विद्या डेव्हिड पेरकावार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध विषयांवर ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत आपली मते मांडल्याने ग्रामसभा अधिक परिणामकारक ठरली.
ग्रामपंचायत सचिव एस.टी. शेंडे यांनी सभेतील विषयांचे सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने वाचन केले.ग्रामसभेत अजेंड्यावरील संबंधित कागदपत्रे, योजना व विषयांची माहिती ग्रामस्थांसमोर स्पष्ट करण्यात आली.आवास प्लस सर्वेक्षणातील प्रतीक्षा यादी, घनकचरा व्यवस्थापन, विकसित भारत रोजगाराची हमी व आजीविका अभियान, शिक्षण, स्वच्छ भारत मिशन, महिला शेतकरी सक्षमीकरण, माझी वसुंधरा अभियान, माहितीचा अधिकार तसेच सौरऊर्जा योजनांसह विविध लोकहिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनीही प्रश्न विचारून आवश्यक माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, चर्चेचा सूर पूर्णपणे सकारात्मक राहिला आणि गावाच्या हिताच्या दृष्टीने विविध बाबींवर सामंजस्यपूर्ण चर्चा झाली.
ग्रामसभेतील विषयांचे वाचन व कागदपत्रांची माहिती राजूर ग्रामसेवक एस.टी. शेंडे यांनी सोप्या व स्पष्ट पद्धतीने मांडत सभा अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली. यावेळी प्र.सदस्य अश्विनी प्रकाश बलकी, कर्मचारीवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रशासनाची स्पष्ट मांडणी आणि विकासाभिमुखमुळे राजुरची ग्रामसभा गावाच्या हितासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणारी ठरली.

