•चारही आरोपीनी केले आत्मसमर्पण.
अजय कंडेवार,वणी : गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून खून, हाणामारी, चोर्या, लूटमार, बलात्कार, विनयभंग, जातीय तणाव यासारख्या घटना दररोज होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक घटना आर्णी तालुक्यात काल दि.22 ऑगस्ट रात्री 8 वाजताचा दरम्यान भररस्त्यात जुन्या वादातुन युवकाचा धारदार शस्राने भोसकुन खुन केल्याची घटना देऊरवाडी येथे रस्त्यावर घडली.
प्राप्त माहितीनुसार शेख समीर, शेख मुस्ताक (24) रा.उत्तम टाकीज जवळ राहत होता. चारही आरोपी राहणार आर्णी असल्याचे समजते. या चारही आरोपींनी संगमत करून जुन्या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने शेख समीर शेख मुस्ताक (24) याचा एका टॉकीजजवळ याचा पाठलाग करून देऊरवाडा रोडवर चाकुने भोसकुन खुन केला यामध्ये शेख समीर शेख मुस्ताक हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला या घटनेची माहीती आर्णी पोलीसांना प्राप्त होताच पोलीसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता, शेख समीर हा रक्ताच्या थारोळ्यात पडुन होता.
पोलीसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. या प्रकरणातील चारही आरोपीनी आत्मसमर्पण केल्याने गुन्हेगारांना पोलीसांचा धाक उरला नसल्याचे हे भयावह वास्तव चित्र आज पाहवयास मिळत आहे. या घटनेत पोलीसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. पुढील वृत्त माहिती मिळेपर्यंत…..

