Ajay kandewar ,Wani:- पत्रकारिता ही केवळ नोकरी नाही तर समाजाशी असलेली जबाबदारी आहे. या जबाबदारीला खऱ्या अर्थाने न्याय देणारे नाव म्हणजे गणेश नारायण खडसे. यवतमाळ येथील स्थानिक पातळीवरील प्रश्न असो वा जनतेच्या मनातील वेदना, त्यांचा बुलंद आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी नेहमीच धाडसाने केले.
गावागावातील समस्या त्यांनी आपल्या लेखणीतून पुढे आणल्या. जनतेच्या प्रश्नांची जिवंत बाजू उलगडून दाखवणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीमुळेच त्यांना जनतेचा पत्रकार ही ओळख मिळाली.गणेश खडसे यांचा वाढदिवस हा फक्त औपचारिक उत्सव नाही तर पत्रकारितेच्या निडर परंपरेला उजाळा देणारा दिवस आहे. जनतेच्या मनातील भावना निर्भीडपणे मांडण्याचे साहस, अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहण्याची ताकद आणि सत्यासाठी झगडण्याची तयारी – हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना असेच म्हणावेसे वाटते . तुमचा बुलंद आवाज समाजातील सत्य उजागर करत राहो, आणि आगामी काळातही जनतेचा विश्वासू प्रहरी म्हणून तुमची ओळख अधिकाधिक बळकट होवो!
🎉 गणेश खडसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक:- •अमरावती पोलीस क्लब,यवतमाळ जिल्हा पोलीस दल,•यवतमाळ पत्रकार संघ.