Ajay kandewar,वणी : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये सोनाली प्रशांत उर्फ छोटू निमकर आणि ऋतिक लक्ष्मण मामिडवार यांच्या डोअर टू डोअर प्रचार मोहिमेला जोरदार वेग आला आहे. घराघरांत पोहोचत मतदारांशी थेट संवाद साधत असताना परिसरात अक्षरशः धूमधडाका पाहायला मिळत आहे.
प्रचार मोहिमेदरम्यान माजी आमदार संजीवरेड्डी बोधकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोर्डे, वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार विद्या खेमराज आत्राम , तसेच माजी नगरसेवक छोटू निमकर यांच्यासह अनेक मान्यवरांची व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती राहिली. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये आणखी जोश निर्माण झाला असून प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.सोनाली निमकर व ऋतिक मामिडवार यांच्या भेटीगाठीदरम्यान नागरिकांनी विविध प्रकल्पांबाबत अपेक्षा व सूचना व्यक्त केल्या. मतदारांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता या दोन्ही उमेदवारांचा विजयाचा मार्ग अधिक भक्कम होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.प्रभाग ५ मध्ये सुरू असलेला हा दमदार प्रचार सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरत असून येत्या काही दिवसांत याला आणखी वेग मिळण्याची चिन्हे आहेत.

