Ajay, Vidharbh News : “त्या” पुलाजवळ मोठा कथित जुगार क्लब सुरू असल्याची चर्चा आता जोर धरत आहे. या क्लबमध्ये दररोज तीन पत्ती कट पत्ता खेळ सुरू असतो आणि लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने आणि काहींचे संसार रातों रात बर्बाद होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी मोठमोठे आणि रग्गड जुगारी रोज येत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हा केवळ छोटा जुगार नसून “हायप्रोफाइल जुगार” असल्याचे बोलले जात आहे. परतू विशेष एक महत्त्वाची बाब समोर येत आहे की हा कथित जुगाड चालवणारा नेत्याचा माणूस म्हणून याची विशेष ओळख आहे आणि याबाबत माहिती घेतली असता हा नेत्याचा ‘माणूस’ “रेती देखील मस्त अवैध उपसा करून मार्गी लावत होता” आणि “आता हायप्रोफाइल जुगार चालवत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
या कथित क्लबमध्ये दररोज लाखोंचा डाव लागत असल्याची माहिती समोर येत आहे. बाहेरून येणारे जुगारी, मोठ्या पैशांची देवाणघेवाण आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली गर्दी यामुळे या ठिकाणी नेमके काय चालते, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्व चर्चेत किती तथ्य आहे, हे पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे.आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी काय करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील माहितीवरच अवलंबून न राहता या ठिकाणाची स्वतंत्र माहिती घ्यावी, साध्या वेशातील पोलिसांकडून वस्तुस्थिती तपासावी आणि जुगार सुरू असल्याचे आढळल्यास अचानक कारवाई करावी,
लाखोंचा कथित डाव सुरू असेल तर तो थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी थेट मैदानात उतरतील का? या कारवाईकडे आता लक्ष लागले आहे. जुगार सुरू असल्याची चर्चा खरी असेल तर हा कथित क्लब बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

