Sunday, May 31, 2026
HomeBreaking Newsखळबळजनक! लग्नाला आलेल्या महिलेच्या ३ तोळे सोन्यावर डल्ला.....!

खळबळजनक! लग्नाला आलेल्या महिलेच्या ३ तोळे सोन्यावर डल्ला…..!

•तपास डी. बी प्रमुखाकडे सुपुर्द.

Ajay Kandewar,Wani :- सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे. आणि लग्न म्हटले की नटणे- थटणे आणि सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघाने आलेच. पण याच संधीचा फायदा घेण्यासाठी चोरटे देखील तितकेच तयारीत असतात. मात्र आयोजित करण्यात आलेल्या लग्न सोहळ्यात सोन्याचेदागिने चोरीला गेल्याची घटना घडली.

वणी येथे एक लग्न सोहळा तिरुपती मंगल कार्यालय आयोजित करण्यात आला होता.घुग्गुस् परिसरात राहणारी ५८ वर्षीय महिला सरस्वती भालचंद्र गाताडे रा.घुग्गूस ता. घुगुस,जि. चंद्रपुर ही आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी वणी परिसरात आली होती. आणि लग्नात मग्न झाली. जेंव्हा ती जेवायला बसली तेंव्हा तिला लक्षात आलें की, तिचा गळयातील पोत दिसत नाही आहे,तेव्हा तिने शोधा शोध सूरू केला.तरीही ती पोत कुठेही आढळली नाही. आणि न कळताच त्या लग्न हॉल मध्ये जवळपास 3 तोळ्यांची पोत कुणीतरी चोरल्याची भंबेरी उडाली. त्या महिलेने थेट वणी पोलीस स्टेशन गाठत आपबिती सांगितली आणि त्यात माहिती मिळाली की,अज्ञात ईसमाने माझ्या नकळत माझ्या गळ्यातील जुनी वापरती साडे तीन तोड्याची सोन्याची पोत अंदाजे कि 1,13,050/- रुपयाची पोत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेली.अशी ठाण्यात जूबानी रिपोर्ट वरुन वणी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास डी. बी प्रमुख धीरज गुल्हाने यांच्याकडे देण्यात आला .

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page