Ajay Kandewar,Wani:- वर्धा नदीपात्रातील झोला घाटात जेसीबी व दोन टिप्परद्वारे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्यावरून शनिवारी मध्यरात्रीनंतर जेसीबी कंपनीची पोकलेन मशीन व रेती भरलेला एक हायवा (MH ४० एन ६६७०) जप्त केला व एका हायवा चालकाने तेथून वाहनासह पळ काढला. मात्र, धाड पडली तेव्हा घटनास्थळावर उमेश बोढेकर हा उपस्थित असल्याचे तहसीलदार निखिल धुळधर यांनी सांगितले होतें. यावरून आबिद हुसेन यांनी 7 एप्रिल रोजी वणी SDO यांना निवेदन सादर केले आणि त्या निवेदनात अनेक प्रश्न केलें. ते प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनुत्तरीत मिळाले.
आबिद्द हुसेन यांचा निवेदनातून SDO यांना मागणी करण्यात आली की, एक हायवा जप्त केले व एक हायवा ट्रक घेवून चालक पळून गेला. त्या हायवा ट्रक चालकावर 7 दिवस लोटूनही पोलीस FIR का दाखल करण्यात आले नाही व तहसीलदार यांनी रेती घाटावर व्हिडीओ रेकॉर्डींग केलेले आहे त्यामध्ये एक इसम दिसत आहे तो नेमका कोण? तो मध्यरात्री तिथे का? आणि तहसिलदार यांचा बाजूला उपस्थित राहुन हायवा चा चालकासोबत काय बोलत होता? हे अद्यापही प्रश्नच आहे. तहसिलदार यांनी झोलां घाटात हायवा व मशीन जप्त केले आहे.त्याचा मालक कोण आहे? शेवटीं 8 दिवस उलटून ही गेले कारवाई थंडबस्त्यात आहे.अद्यापही मालक कोण ?यावर त्याचा तपास लागलेला नाही.नेहमी वणी तहसील चा महसूल पथकांनी जे कोणती कारवाई केली त्यात जास्तीत जास्त रेती चोरटे किंवा मालक हा कधीच आरोपी न होता फक्त ट्रॅक्टर चालक व हायवा चालक यावर थातुरमातुर कारवाई करून ट्रॅक्टर जप्त व मालक त्या चोरीचा गुन्ह्यापासून अलिप्त ठेवण्याचे पाप याच महसूल प्रशासनानं केल तसेच झोला शिवारात अवैध बनविलेले रेती घाटावर किती ब्रास रेती चोरी गेली याची मोजणी करुन त्या रेतीचा दंड संबंधित रेती तस्करांकडून वसूल करण्यात यावा. पण मोजणी अद्यापही झाली नाही यातही पाणी मुरत कूठे आहे…? यामागील गौडबंगाल काय आहे. हे यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी जातीने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.या निवेदनाचा प्रती म . रा.महसूल मंत्री, यवतमाळ पालकमंत्री, यवतमाळ जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले. परंतु अबिद हुसेन यांनी विदर्भ न्यूज ला माहिती दिली की, मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हा प्रकार सांगणार आहो व लेखी निवेदन देऊन त्या तस्कराविरोधात व तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी, यासाठ्ठी कलेक्टर साहेब यांना लेखी विनंती करणार आहो व तिथेही माझा निवेदनावर कारवाई झाली नाहीतर मी थेट म.रा .महसूल मंत्री यांनाही भेट देणार आहों.
•”त्या एका खादाडामूळे” प्रशासनावर उडाले ताशेरे….. तो शोधणे गरजेचे……
“आजगत्त रेती चोरटे सुसाट रेती चोरी करीत आहे आणि प्रशासनाचा कारवाईला धाजवत नाही आहे. याच मुख्य कारण “तो एक खादाड” जाच्या सेटिंगने हा पाप घडतो .त्याला तहसिलदार साहेबांनी शोधणे गरजेचे . तेंव्हाच महसूल प्रशासनावरील उडालेले ताशेरे कमी होईल. यात काही शंका नाही .” त्या एका खादाड “मूळे प्रशासनाच नाव मातीमोल झाले आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे.”

