Saturday, May 9, 2026
Homeमारेगावअल्पवयीन मुलीचा बालविवाह, चार महिन्याची गर्भवती

अल्पवयीन मुलीचा बालविवाह, चार महिन्याची गर्भवती

नागेश रायपूरे,मारेगाव:- चक्क ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह कुटुंबीयांनी ५ महिन्या पूर्वी विवाह लावून दिला. ती चार महिन्याची गरोदर राहिल्यावर तपासणीसाठी दवाखान्यात गेली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी मुलीची आई व तिच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बालविवाह प्रथा रोखण्यासाठी स्वातंत्र पूर्व काळा पासून अनेकांनी संघर्ष केला. यासाठी इंग्रज शासना सोबत अनेक समाज सुधारकांनी लढा दिला. या विरुद्ध शासनाने ही कडक कायदे केले आहे. प्रशासन ही वेळोवेळी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतात.तरीही समाजात आज ही प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून बालविवाह होत असल्याचे यातून निदर्शनास येते.
करणवाडी येथील एका महिलेने आपल्या मुलीचा विवाह दि १८.७.२०२२ ला लावून दिला. त्यावेळेस मुलीचे वय अवघे ११ वर्षाचे होते. ती आता चार महिन्याची गरोदर आहे.आईने चार महिन्याच्या गरोदर मुलीला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली .
पोलिसांनी मुलीची आई व पती अंकुश अमरसिंग राऊत वय २४ वर्षे रा सालेभट्टी ता भिवापूर जिल्हा नागपूर यांचे विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो, बलात्कार आदी कलमा अन्वये गुन्हे दाखल केले आहे. तसेच आईला अटक करुन जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आले. तर पती ऊसतोडनी ला गेला असल्याने अटकेसाठी पथक रवाना झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page