•कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – जय भीम उत्सव समितीचे आवाहन
नागेश रायपूरे, मारेगाव:-१ जानेवारी २०२३ रोजी येथील धम्म राजीका बुद्ध विहार मारेगाव येथे भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जय भीम उत्सव समिती मारेगावच्या वतीने करण्यात आले आहे.
यात सकाळी ९.३० वाजता विजय स्तंभास मानवंदना व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन. व सकाळी १०.३० वाजता धम्मराजीका बुद्ध विहार येथे सामूहिक बुद्धवंदना. तसेच सकाळी ११.३० वाजता आंबेडकर मार्चचे प्रणेते तथा प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व लेखक आयु. रमेशजी जीवने यवतमाळ यांचे वर्तमान, राजकीय, लोकशाही ,भारतीय राज्यघटना व धम्मक्रांती या विषयावर जाहीर व्याख्याना चा कार्यक्रम. तसेच दुपारी १२.३० वाजता संविधान दिनाचे औचित्य साधुन ४ डिसेंबर रोजी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या “संविधान गौरव दिन” परीक्षेचे भव्य बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील तमाम समाज बांधवांनी या कार्यक्रमात उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय भीम उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.