•मशहूर कव्वाल जुनेद सुलतानीची मेजवानी.
सुरेंद्र इखारे,वणी :- येथील हॉटेल जन्नत सेलिब्रेशन येथे दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोज रविवारला सायंकाळी 6.00 वाजता जशने ईद मिलाद दुन्नबी च्या निमित्ताने महफिल -ए- कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार हे उपस्थित राहणार आहे. प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजजलवार, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार विवेक पांडे, नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस, नगर परिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष इजहार शेख, डॉ महेंद्र लोढा, वणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद निकुरे, हॉटेल जन्नत सेलिब्रेशन चे संचालक मिनज शेख उपस्थित राहणार आहे.
वणीकर जनतेनी मशहूर कव्वाल जुनेद सुलतानी यांच्या प्रख्यात कव्वालीच्या मेजवाणीचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन के.जी. एन. युवा कमिटी वणी यांनी केले आहे.