•ऐन निवडणूका घोषित होताच…..नगरपरिषद बनले समस्यांच माहेरघर….!
•राजकीय स्टंट करणाऱ्यांना सुजान नागरिक ओळखणार का?
•बाशिंग बांधून असणाऱ्यांचे ‘ निवेदने’ रंगवणे सुरू.
अजय कंडेवार,वणी:- नगर पालिकेचे शहरातील साफसफाई व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचे धडे देणारी नगर पालिकाच शहर स्वच्छ ठेवण्यात असमर्थ ठरू लागली आहे हे खरच. पण हे देखील पाच वर्षानंतरच बाशिंग बांधून असणाऱ्यांना दिसू लागले आहे. यातह तिळमात्र शंका नाहीं .शहरातील बहुतांश प्रभाग व वस्त्यांमध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या आजूबाजूला घाण कचरा जमा झाला असतांनाही त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांनी जाणे येणे करतांना नाकावर रुमाल ठेवण्याची वेळ आली परंतु या सर्व समस्या फक्त निवडणूक घोषित होताच नागरिकांचा माध्यमातून हवसे नवस्याना दिसणे सुरू झाले आहे.As soon as the election was announced.Municipal Council became the home of problems.Will Sujan Citizen recognize those doing political stunts?वणी शहरातील काही परीसरात रस्त्यावर कचरा साचला असून कचरा गोळा करणारी घंटागाडी येत नाही आणि घंटागाडी येत नसल्याने नागरीक रस्त्याच्या बाजूला कचरा फेकत आहे. यातही नगर परीषदचा एक कर्मचारी येवुन बारकोड स्कॅन करून जातो परंतु कचरा संकलन करणारी घंटागाडी येत नाही असा आरोपही अनेक नागरिक करू लागले आहे. आता हे आरोप चालणारच त्यात काहीच शंका नाही परंतु यात फायदा कोणाचा हे कोडच?. मग 5 वर्ष सर्व परिस्थिती छान होती का? असाही सवाल निर्माण होतो.
घाण कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडल्याने नागरिक खुल्या जागेत कचरा टाकतांना दिसत आहेत. शहरात जिकडे तिकडे अस्वच्छता निर्मण झालेली असतांना नगर पालिका प्रशासनाने मात्र आंधळेपणाचं सोंग घेतलं आहे.नगर परीषदच्या या प्रकाराने नागरिकांना त्रास तर आधीही होता आताही होत आहे परंतु यात संधी घेणाऱ्याना व राजकीय स्टंट करणाऱ्यांना नागरिक ओळखणार का?स्वच्छतेचे धडे देणाऱ्या नगर पालिकेने ठेवण्याची जबादारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशी साधारण नागरिकांकडून बोलल्या जात आहे.