•राष्ट्रवादी यांनी निवेदनाद्वारे घातले वनमंत्री यांना साकडे.
अजय कंडेवार,वणी :–परिसरात मुक्त संचार करत असलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्याकरीता विजय नगराळे व राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी वणी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) व वणी उपविभागीय अधिकारी यांचा मार्फत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाव्दारे साकडे घातले आहे.
तालुक्यात वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे प्रभावित झाली आहेत. त्याची दखल घेत या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वणी राष्ट्रवादी तर्फे करण्यात आली .तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये शेती हेच एकमेव उपजीविकेचे साधन आहे. शेतकरी आणि शेतमजुरांची संख्यादेखील या भागात सर्वाधिक आहे. सद्य:स्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तूर तोडणी सुरू आहे. अशातच परिसरात वाघाने धुमाकूळ घातल्याने शेतीकामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. शेतातील पिकाच्या रखवालीसाठी अनेक शेतकरी शेतात रात्री जागलीसाठी जातात. त्यांचा जीव धोक्यात असल्याने या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. येत्या 15 दिवसांत वाघाचा बंदोबस्त केला नाही तर संविधानिक मार्गाने राष्ट्रवादी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
यावेळी निवेदन देताना (जिल्हा सरचिटणीस ) विजय नगराळे , (ओ.बी.सी सेल अध्यक्ष) – गुणवत्ता टोंगे, (शहर उपाध्यक्ष) रामकृष्ण वैदय ,(तेली समाज अध्यक्ष) सुरेश पिसे, (जिल्हा उपाध्यक्ष युवा) मुबिन शेख ,(तालुका अध्यक्ष,युवा) – हेमंत गावडे ,(युवा शहर अध्यक्ष) – मनोज वॉकटी,(विद्यार्थी शहर अध्यक्ष) – संदेश तिखट .मोसीम बेग,तौसीफ शेख ,शाबिर शेख ,प्रतिक शंभरकर,अजय अनपुरे,समिर भांदककर, विक्की पेंदोर उपस्थित होते.