•20 चा वर जखमी , जीवितहानी टळली.
अजय कंडेवार,वणी:- मारेगाव महामार्गावर भीषण स्वरूपाचा विचित्र अपघात दि.28 सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री 9 वाजताचा दरम्यान झाला. कॅबिन मध्ये फसलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले आले असून हमसफर ट्रॅव्हलची उभ्या टिप्परला मागून धडक दिली. त्यात जीवितहानी टळली.हा टिप्पर बंद अवस्थेत उभा होता अशीही सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
गौराळा रस्त्याच्या बाजूला टिप्पर क्रमांक MH-34 W-9909 उभा असतांना अकोला येथून चिमूर कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक MH-27-A-9994 ने जबर धडक दिली.ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास 50 प्रवासी असतांना यातील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले.भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या टिप्परला मागून धडक दिल्याचे समजते, त्यामुळे हा भीषण अपघात झाला. ही घटना राज्य महामार्गांवरील गौराळा फाट्यावर 9.15 ला घडली असून
सदर ट्रॅव्हल्स ही अकोला येथील असून यातील प्रवासी व भाविक हे तेल्हारा , अकोला येथून ट्रॅव्हल्स भाड्याने करून चिमूर येथे दर्शनासाठी जात होते.सुदैवाने जीवितहानी टळली असून दुतर्फा वाहतूक प्रभावित झाली आहे.या अपघातातील अपघात ग्रस्ताना बाहेर काढण्यात आले. कॅबिनमधून त्या जखमी असलेल्या महिलांना कटरचा साहाय्याने काढण्यात आले.हे विशेष.