नागेश रायपूरे, मारेगाव:– प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन येत्या २९ जानेवारी रोजी येथील नगर पंचायत मारेगावच्या भव्य पटांगणात विदर्भ स्तरीय एकल व समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील तमाम स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था मारेगाव द्वारा संलग्नित “स्वरधारा ग्रुप” च्या वतीने करण्यात आले आहे.
मारेगाव शहरात सदोदित सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात सक्षम असणाऱ्या “स्वरधारा ग्रुप” च्या वतीने ग्रामीण भागातील नृत्य कलावंतांच्या कलेला वाव देण्यासाठी दरवर्षी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुध्दा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन येत्या 29 जानेवारीला मारेगाव शहरात विदर्भ स्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत समूह नृत्या साठी जनहित कल्याण संघटना मारेगाव तर्फ अनुक्रमे प्रथम पारितोषिक २०,००१/- ,द्वितीय १५,००१ , तृतीय १०,००१ रुपये रोख व ट्राफि तसेच एकल नृत्या साठी सुद्धा जनहित कल्याण महिला संघटना मारेगाव तर्फ, प्रथम पारितोषिक १०,००१/-, द्वितीय ७,००१, तृतीय ५,००१/- रुपये रोख व ट्राफि ठेवण्यात आले आहे. तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून एकल व समूह नृत्यासाठी १००१/- रुपयां प्रमाणे एकूण सहा बक्षिसे व ट्राफि ठेवण्यात आले आहे.
तरी विदर्भातील तमाम नृत्य कलावंतानी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरधारा ग्रुपचे नागेश रायपूरे, अशोक कोरडे, विवेक बोबडे, विशाल किन्हेकर, सचिन देवाळकर, श्रीकांत सांबजवार, शेख इफतेखार, निखिल कोरडे, हरीश नेहारे, मोहन शेंडे, आदीप आत्राम, सागर लोणारे आदींनी केले आहे.