अजय कंडेवार,वणी – शहराची लोकसंख्या व शहराचा विस्तार पाहता वणी नगर पालिकेत शहरातील शौचालय (संडास टाकी) साफ करण्यासाठी मोबाईल शौचालय यंत्र नाही किंवा नगर पालिकेकडे शौच साफ करण्याची कुठलीच व्यवस्था नाही . त्यामुळे शहरातील असंख्य घरातील संडासचे टाके भरल्याने घरात दुर्गंधी पसरून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.Hazard to health due to stench.Battyabol’ of Swachh Bharat Mission Yojana..!
शहरातील अनेक नागरिक आरोग्य कार्यालयात चकरा मारत असून येथील कर्मचारी म्हणतो शौचालय साफ करण्याचे यंत्र बिघडल्याने नवीन येणार आहे .त्यासाठी एक ते दीड महिना थांबावे लागेल अशी बतावणी करण्यात येते त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तेव्हा नगर पालिका प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून वणी च्या नागरिकांना शौचालय साफ करण्याचे यंत्र त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणीला जोर धरल्या जात आहे.
शासनाने देशात स्वच्छता निर्माण व्हावी यासाठी स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत शौचालय अनुदान योजना सुरू केली परंतु शौचालय साफ (स्वच्छ) करण्याचे यंत्रच नसेल तर नागरिकांना नाईलाजास्तव उघड्यावर शौचास बसावे लागेल त्यामुळे परिसरात दुर्गंधी रोगराई पसरून आरोग्याला धोका निर्माण होईल तेव्हा शासन एकीकडे योजना देते तर दुसरीकडे शौच साफ करण्याचे यंत्रच नाही त्यामुळे स्वच्छता अभियान मिशनचा बट्ट्याबोळ होताना दिसून येत आहे.
तेव्हा नगर पालिका प्रशासनाने शहराची स्वच्छता राखण्यासाठी शौचालय साफ करण्याचे यंत्र त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून शहरात रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही परंतु [ नगर पालिका कर्मचारी सांगत सुटले की खासगी यंत्रणेकडून साफ करून घ्यावे अन्यथा नवीन येईल तेव्हाच संडासचे साफ करण्यात येईल दुसरी कुठलीच व्यवस्था नाही असे सांगत] त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासन शौचालय अनुदान 12 हजार देते आणि खासगीमध्ये शौचालय साफ करण्यासाठी 12 हजार रुपये लागत असल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे तेव्हा नगर पालिका प्रशासनाने त्वरित शौचालय साफ करण्याचे यंत्र उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.