अजय कंडेवार,वणी :– दिनांक 2 ऑक्टोंबरला गांधी जयंतीचे औचित्यसाधून मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सि.बी.एस.ई शाळेत स्वच्छता श्रमदानातून राष्ट्रपिता गांधीजींना अभिवादन करण्यात आले तसेच प्रमूख पाहुणे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी कित्येक लोकांनी आपलं आयुष्य वेचलं. कित्येक लोकांनी बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोंबर 2022 रोजी जयंती शाळेचा परीसरात शिक्षक व विद्यार्थी यांनी स्वच्छतेचा जागर करीत अतिशय साध्या पद्धतीत जयंती साजरी करण्यात आली. त्यात प्रमुख अतिथी आमदार यांनी विद्यार्थ्यांना गांधी जयंती तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छ अभियान सेवा या विषयावर नाट्य सादर केले. महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत संकेत पानघाटे, भारत माता संदेश सारडा ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका रुद्राक्ष राखूंडे या सर्वांनी नाट्य सादर करून उपस्थित पाहुणे विद्यार्थी व शिक्षक सर्वाँना स्वच्छतेचा संदेश दिला.शाळेचा मुख्यद्यापिका श्रीमती शोभना मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच उपस्थित सर्व पाहुण्याचे कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आमदार संजीवरेड्डी बोदुकुरवार,पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे ,दिनकर पवाडे ,विजय पिदुरकर ,जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर ,गजानन विधाते उपस्थित होते . डींकी शुगवानी व शिक्षिका मोना कैलास पाईकराव यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे संचालन विवेक खामनकर,भाग्यश्री समर्थ तर आभार प्रदर्शन मृण्मयी सुत्रावे यांनी केले. या कार्यक्रमाकरिता शाळेचे शारीरिक शिक्षक सुधीर लडके व समस्त शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.