Ajay Kandewar,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी येथील आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त शाळेचा वतीने कर्तव्य जननी यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवार ९ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजता सिटी ब्रांच चा प्रांगणात शाळेचा मुख्यध्यापिका शोभना यांचा अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करून आणि ईशरस्तवन गीत गाऊन करण्यात आली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले समाजसेविका अंजुला चिंडालिया यांच्या सत्कार मुख्यध्यापिका शोभना यांच्या हस्ते करण्यात आले.

“२१ व्या शतकात स्त्रियांनी सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली. याचे श्रेय महामानवांना जाते. अनेक महामानवांनी शिक्षणाची दारे उघडून आमच्यासाठी प्रगतीचे दालन उघडे करून आम्हा स्त्रियांना अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिले. त्यातूनच नोकरी, शिक्षण, खेळ अशा अनेक क्षेत्रात संधी मिळाली. परंपरावादी दृष्टिकोन झुगारून आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारले. त्यातूनच स्त्री स्वावलंबी झाली. म्हणून पुढील पिढीसाठी एकच माझे म्हणणे आहे की सर्वप्रथमतः स्त्रीयांनी स्वतःशी मैत्री कराल तेव्हाच स्त्री शक्तीचा जागर होईल आणि हीच आमची नैतिक जबाबदारी असायला पाहिजे, असे प्रतिपादन समाजसेविका अंजुला चिंडालिया यांनी केले.”

“स्त्रियांनी आपल्या अंतर्गत मनाला स्वच्छ करा, जेणेकरुन चिरकाल टिकेल.बाह्य रूप कितीही सुंदर असल की तो नाश होतोच. म्हणून स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाला स्थान देऊन नावाची व कामाची कायमची छाप सोडणे गरजेचे आहे. तसेच मानसिक गुलामगिरी झुगारून बौद्धिक प्रगल्भता येण्यासाठी आत्मीय विचार जोपासले पाहिजेत.बौद्धिक प्रामाण्यवाद जर आमच्या स्त्रियांनी अंगीकारले तर वास्तवात स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व खऱ्या अर्थाने रुजेल,असे मत अध्यक्षस्थानी असलेलें मुख्यध्यापिका शोभना यांनी मांडले.”
कार्यक्रमात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा सूत्रावे यांनी केले व आभार प्रदर्शन श्रद्धा निखाडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर व कर्मचारीवर्ग यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.