अजय कंडेवार,वणी- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई शाळेत “मॅकरून स्पोर्ट्स फेस्ट कार्निवल” सोहळा २० ते २४ जानेवारी कालावधीत आयोजित करण्यात आले .
सोमवार,२० जानेवारी २०२५ रोजी मॅकरून शाळेत “स्पोर्ट्स फेस्ट कार्निवल” या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे शानदार उद्घाटन होईल त्यानंतर नर्सरी ते इयत्ता-५ वी च्या मुलांसाठी मनोरंजक मजेदार खेळ, रिले रेस आणि कवायती, टणल रेस, रानींग, लेमन स्पून, बनी रेस, वॉशिंग मशिन गेम, फुटबॉल असतील.दुसरा दिवस इयत्ता ६ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी शर्यती, रिले आणि सांघिक खेळांसह विविध क्रीडा स्पर्धानी भरलेला असणार आहे.चार दिवस चालणाऱ्या या कीडा महोत्सवात ट्रैक भाणि फील्ड इव्हेंट्स, रिने आणि शर्यती, मजेदार खेळ, रंगीत कवायती इत्यादींसह विविध विषयांसह वैशिष्टीकृत केले जाईल.पालकांसाठी विविध क्रीडा स्पर्धासह आनंद मेळावा आणखीनच रोमांचक होईन व पाहुण्यांच्या हस्ते पालक आणि विद्यार्थ्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देण्यात येतील. दिं २४ रोजी होणाऱ्या आनंद मेळाव्यास(Fun and Food)पालक व विद्यार्थांना आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन शाळेचें संचालक पी .एस.आंबटकर व शाळेचा मुख्याध्यापिका शोभना यांनी केले.