मारेगावात दोन अज्ञात चोरट्यांनी केले ५ तोडे सोन्याचे दागिने लंपास…
नागरिकांनो सतर्क राहावे मारेगाव पोलिसांचे आवाहन
नागेश रायपुरे, मारेगाव:- सोन्याचे दागिने साफ करुन देण्याचे बहाण्याने चक्क पाच तोडे सोन्याचे दागिने घरुन लंपास केल्याची खळबळजनक घटना मारेगाव शहरातील प्रभाग क्र.6 मध्ये 23 सप्टेंबर च्या सकाळी 10.45 वाजता दरम्यान घडली.या प्रकरणी त्या दोन अज्ञात चोरट्या विरोधात मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार फिर्यादी शंकर झिबलाजी गारघाटे (80) हे मारेगाव शहरातील प्रभाग क्र.6 मधील रहिवासी आहे. दोघेही वय वृद्ध पती पत्नी घरी असतांना दोन अज्ञात व्यक्ती घरी आले व त्यांनी जुने सोन्याचे दागिने साफ करून देतो असे सांगितले.दरम्यान त्या दोन अज्ञात चोरट्यांनी पाच तोडे वजनाचे जुने सोन्याचे दागिने कुकर मध्ये साफ करण्यासाठी टाकले व फिर्यादीची पत्नी घरात किचनरुम मध्ये गेले असता, त्या चोरट्यानी हात चलाखी करत ते सोन्याचे दागिने घरच्या कुकर मध्ये साफ करण्यासाठी न टाकता लंपास करत नजरचुकवत ते पसार झाले.
सोन्याचे दागिने लंपास करून पसार झाल्याचे कळताच फिर्यादी शंकर गारघाटे यांनी पोलीस स्टेशन गाठत थेट त्या दोन अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली असता.मारेगाव पोलिसांनी त्या दोन अज्ञात चोरट्या विरोधात कलम 406/34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.पुढील तपास जमादार आनंद अचलेवार करत आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन :-
“घरी अनोळखी व्यक्ती येवून सोन्याचे दागिने चमकवून देण्याचे बहाण्याने हातचलाखी करत सोने लंपास केल्याच्या घटना आपल्या परिसरात घडत असुन त्या अनोळखी व्यक्ती पासून सतर्क राहावे. असे अनोळखी व्यक्ती सोने चमकवून देत असल्याचे सांगितल्यास त्यांना बळी न पडता तत्काळ पोलीस स्टेशन ला कळवावे तथा टोल फ्री.112 वर संपर्क साधावा असे आवाहन मारेगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.”