अजय कंडेवार,वणी:- सुशगंगा पॉलिटेक्निक वणी मधे दिनांक 30 डिसेंबर 2022 Alumni Meet हा कार्यक्रम अतिशय उत्साहात घेण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वेकोली वणी नोर्थ एरिया जनरल मॅनेजर आलोक ललित कुमार प्रमुख पाहुणे प्रदिप बॉगिरवर (अध्यक्ष), पुष्पा राणी (प्राचार्या) उपस्थित होते.
कार्यक्रमाथी प्रास्ताविक मधे सुशगंगा पॉलिटेक्निक वणी मधे तंत्रनिकेतन शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्या साथी संस्था अविरत कार्यरत आहे. या वेळी प्राचार्या यांनी विद्यार्थ्याच्या प्रगतीचे कुतूहल करत असताना alumni meet चे मुख्य विद्यार्थ्याना कौतुकाची थाप दिली.
यापैकी विद्यार्थी हे नामांकित कंपनीत कार्य करत आहेत त्यात कोल इंडिया लिमिटेड, एलएंडटी, बजाज ऑटो मोबाइल प्राइवेट महिंद्रा एसके प्राइवेट लिमिटेड, 3जी एसोसिएटेड प्राइमस सैम प्राइवेट लिमिटेड, टाटा मोटर्स प्राइवेट लिमिटेड मधे कार्यरत आहे. अध्यक्षपदी भाषण देताना प्रदिप बोनगिरवार यांनी संस्थेच्या प्रगतीची पावून वाट दाखवली. मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आलोक ललित कुमार(वणी उत्तरी क्षेत्र महाप्रबंधक) यांनी विद्यार्थ्याना प्रोत्साहन देताना,” टेक्निकल शिक्षणाचा उपयोग किती पद्धतीने करता येत हे अगदी सोप्या भाषेत पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन वृषाली कारमोरे ( मायनिंग च्या विभाग प्रमुख), कुसुम कश्यप कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुजाता परसावार ( इलैक्ट्रॉनिक विभाग प्रमुख) यांनी केले. य कार्यक्रमाचे कर्मचारी वृंद व उपस्थीत विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.