देव येवले,झरी (वा) : सुर्दापूर येथील शेतकरी गजानन सुदर्शन संकसनवार (वय 55) यांनी 16 सप्टेंबर ला विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.


मृत व्यक्ती गजानन हा शेतकरी असून सततच्या नापिकी व कर्जबाजारी असल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे समजते. त्याच्या मागे वयोवृद्ध वडील, पत्नी व दोन मुले आहे.


