अजय कंडेवार,Wani:- केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे काम फक्त रेतीअभावी रखडलेले आहे. परंतु आता प्रशासन रेतीघाटातून ५ ब्रास रेती विनामूल्य घरकुल लाभार्थ्यांना देण्यास तयार झाले असून, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. अशात लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर त्यांना विनामूल्य रेती उपलब्ध होणार आहे. यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेंतर्गत तालुक्यात शेकडो घरकुल मंजूर झाले आहेत. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला आहे.त्यामुळे मोहदा येथील उपसरपंच सचिन रासेकर यांनी पुढाकार घेत त्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ शिंदोला येथील रेती डेपो चालू करून रेती उपलब्ध करून द्यावी याकरीता लाभार्थ्यांना सोबत घेत वणी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
वणी तालुक्यातील एकही रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने रेतीच उपलब्ध होऊ शकत नाही. यात विशेष म्हणजे, चोरट्या मार्गाने महसूल विभागाचा संगनमताने सर्वत्र रेती उपलब्ध होत असली तरी ती अधिकच्या किमतीत रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे आहे.परिणामी शेकडो घरकुलाचे बांधकाम रखडले आहे.परंतु तालुक्यातील अनेक घाटांचे लिलाव करण्यात न आल्याने महसूल प्रशासनाने या घाटांमधून रेती उपसा जोमात सूरू आहे. या रेतीचोरीला मूकसंमती दिले काय हा प्रश्न देखिल उपस्थित केला आहे. ती रेती 6 ते 7 हजार रुपये प्रती ब्रास दराने खरेदी करावी लागत असल्याने गरीब लाभार्थींना ती आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगी नाही. हा संपूर्ण प्रकार महसूल विभागातील लहान कर्मचार्यांपासून ते मोठ्या अधिकार्यांपर्यंत सर्वांना माहीत आहे. मात्र कुणीही बोलायला व काही करायला तयार नाही, असा आरोप घरकुल लाभार्थ्यांनी केला आहे. यावेळी मोहदा येथील घरकूल लाभार्थी व उपसरपंच सचिन रासेकर उपस्थित होते.