•महाराष्ट्रासह वणीचा शिरपेचात मानाचा तुरा.
अजय कंडेवार,वणी :- औरंगाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्केटिंगपटूंनी धमालच उडवून दिली आहे. त्यातून रिले स्पर्धेत “सानवी माधव शिंदे ” हिने राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत 2 सुवर्णपदक जिंकून शानदार “गोल्डन गर्ल “म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात नावारुपास समोर येत वणीचा इतिहासातही पुन्हा एक मानाचा तुराच म्हणावं लागेल. विशेषतः या सानवी ने “All India Relay Skating championship ” महाराष्ट्र गोल्डन गर्ल” या नावाने 2 गोल्ड मेडल प्राप्त करीत गौरवच केलं आहे. या मुलीची ओळख म्हणजे वणी पोलीस स्टेशन येथील डी. बी प्रमुख एपीआय माधव शिंदे यांची मुलगी…..! पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याचा मुलीने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेला मान म्हणजे पोलीस खात्यातही गौरवास्पद बाबच म्हणायला ही हरकत नाहीं…!Sanvi Madhav Shinde won 2 gold medals in National Skating Championships.Wani’s Shirpechat Mana Tura with Maharashtra.
ही स्पर्धा 1 जुन ते 3 जून दरम्यान गारखेडा स्टेडियम, औरंगाबाद येथे अखिल भारतीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धा पार पडली. ज्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 9 राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यात सानवी माधव शिंदे राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत काल दिं.2 जून शुक्रवार रोजी 2 सुवर्णपदक…..!महाराष्ट्रात टॅलेंटची कमतरता नाही, आता मुलांप्रमाणेच मुलीही आपले कौशल्य सिद्ध करून राज्याचा गौरव करत आहे. महाराष्ट्र कन्या सानवी शिंदे हिने औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवून राज्याचे नाव उंचावले आहे. सानवी माधव शिंदे हिने 6-9(beginers) वयोगटात 2 सुवर्णपदक पटकावले आहे. ” 1 गोल्ड मेडल हे रीले मध्ये तर दुसरे गोल्ड मेडल स्पीड अप “ या शर्यत कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रमही केला आहे. सानवीच्या या विक्रमामुळे महाराष्ट्राच्या खात्यात स्केटिंगमधील 2 सुवर्णपदकाने भर पडली आहे. या विजयाने समस्त महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.