Friday, October 23, 2026
Homeवणीसहकार व ग्रामविकासाचा संगम (उबाठा)शिवसेनेत .... 

सहकार व ग्रामविकासाचा संगम (उबाठा)शिवसेनेत …. 

•विरोधकांच्या कपाळावर आठ्या. •वणी राजकारणात नवे समीकरण

Ajay kandewar, Wani :- तालुक्यातील राजकारणाला नवा आयाम मिळवून देणारी घटना नुकतीच घडली. सहकारक्षेत्रातील अनुभवी नेता गणपत रासेकर आणि ग्रामविकास क्षेत्रातील विलास गोसावी पिदुरकर यांनी वणी विधानसभा आमदार संजय देरकर यांचा विशेष उपस्थित (उबाठा )शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला मोठा बळ दिले आहे.

रासेकर यांचा खरेदी विक्री संघातील दीर्घ अनुभव आणि गोसावी पिदुरकर यांचा ग्रामीण भागातील जनाधार – या दोन शक्तींचा संगम आता शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिल्याने पक्षाला कार्यकर्त्यांचा प्रचंड ओघ लाभणार आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील समीकरणे बदलली असून, विरोधकांच्या गोटात मात्र कपाळावर आठ्या उमटल्याचे चित्र दिसते.शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख निखाडे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, “सहकार व ग्रामविकास या दोन भक्कम आधारस्तंभांच्या माध्यमातून आता वणी तालुक्यात शिवसेनेची पकड आणखी मजबूत होणार आहे. गणपत रासेकर व विलास पिदुरकर यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांना नवे बळ मिळेल.”यामुळे वणी राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना गटासाठी हा गेमचेंजर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page