•पोलिस अधीक्षक डॉ पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून पो.स्टे मारेगाव अंतर्गत या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
•’सशक्त यवतमाळच्या नारा… व्यसनाला देऊ नका थारा’
अजय कंडेवार,वणी:– तरुण पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे. त्यामुळे तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करून “सशक्त युवापिढी” घडविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून पो .स्टे मारेगाव अंतर्गत मारेगाव शहरातील मार्डी चौक व मारेगाव येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात ता.17 ऑक्टों.मंगळवार रोजी ‘नशामुक्त पहाट’या अभियानांतर्गत पथनाट्यातून जनजागृती पुणे येथील व्यसनमुक्ती केंद्र मुक्तांगण येथील अमीर देसाई या वक्त्यासह DYSP गणेश किंद्रे व मारेगाव ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
मारेगाव शहरात हा व्यसनमुक्ती उपक्रम दोन टप्प्यात घेण्यात आले एक म्हणजे कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यशाळेचा माध्यमातून तर दुसरे म्हणजे मार्डी चौकात महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुणे येथील व्यसनमुक्ती केंद्र मुक्तांगण येथील अमीर देसाई या वक्त्यासंह Dysp गणेश किंद्रे व ठाणेदार जनार्धन खंडेराव, इतर विभागातील अधिकारी , पालकवर्ग व नागरिकांचाही विशेष उपस्थितीत चित्रफिती व दृकश्राव्याद्वारे मार्गदर्शन केले.
हे अभियान एक चळवळ व्हावे, यासाठी ‘ट्रेनिंग ऑफ द ट्रेनर’ संकल्पनेनुसार पालकवर्ग, शिक्षक, प्राचार्य व पोलीस पाटील यांनाही मार्गदर्शन करून यांच्या सहभागातून घेण्यात आला.