•51 रक्तदात्यांनी केले रक्तदान
अजय कंडेवार,वणी:– श्री.कानिफनाथ महाराज जयंती निमित्त सरोदे समाज संघटना वणी द्वारा रक्तदान Blood donation on behalf of “Sarode Samaj” organization शिबिराचे आयोजन काल दि.11.मार्च 2023 शनिवार रोजी गोकुळनगर येथे करण्यात आले .
या शिबिरामध्ये 51 लोकांनी आपलं रक्तदान केले. परिसरातील अनेक लोकांनी या शिबिरात भाग घेतला व रक्तदान हेच श्रेष्ठदान असा समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न सरोदे समाज संघटनाने दिला आहे.सरोदे समाज संघटनेतर्फे नवनवीन उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक हा भाग म्हणून अतिशय स्तुत्यमय उपक्रम… त्यात नागपुर येथील लाईफ लाईन ब्लड बँक यांचे सहकार्य विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सुभाष वाघडकर होते तर आयोजक दिपक मोरे (तालुका अध्यक्ष), शंकर घोगरे (उपाध्यक्ष), सुरेश वायकर,शंकर गदाई.नागेश आत्मंग,राजू गव्हाणे तसेच संपूर्ण गोकुलनगर मित्र परिवार यांनी कार्यक्रमाचा यशस्वितेकरीता परिश्रम घेतले.Blood donation on behalf of “Sarode Samaj” organization