•उपसरपंच यांच्या थेट लेखी स्वरूपात आरोप.
अजय कंडेवार,वणी:- ढाकोरी ग्रामपंचायतमध्ये सरपंच ,सचिव व एक सदस्य मनमानी कारभार तसेच कामात गैरव्यवहार करीत असल्याची तक्रार उपसरपंच शारदा अनंता शेंडे यांनी ता.26 ऑक्टो.रोजी लेखी निवेदनाद्वारे B.D.O कडे करण्यात आले.
ग्रामपंचायत ढाकोरी येथे मनमानी कारभार होत असून सचिव सरपंच सदस्य मीननाथ काकडे हे तिथे ग्रामपंचायत ढाकोरी कामाचा गैरव्यवहार करत असून स्वतः सदस्य मीननाथ काकडे ठेकेदारी करत आहे ,कामाबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाही. हजेरी बुक व प्रोसिडिंग बुक एकच असल्याने मिटींगच्या दिवशी बाकीच्या सदस्याकडून सह्या करून घेतल्या जाते व नंतर ठराव मंजूर करून ठेकेदारी कामात गैरव्यवहार करत असून ” स्वच्छ भारत मिशन” अंतगर्त एस. बी. एम. मार्फत घनकचरा व्यवस्थापनचे शेड व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम स्वतः ग्रामपंचायत सदस्य मीनानाथ काकडेच करीत आहे . विशेषतः याबाबतही उपसरपंच व अन्य सदस्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाहीं असाही निवेदनातून घणाघाती आरोप लावण्यात आले आहे.म्हणून संबंधित दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी यावेळी उपसरपंच शारदा अनंता शेंडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
“ग्रामपंचायत ढाकोरी सरपंच अजय कवरासे यांना कामाबद्दल विचारले असता ते काम काकडे यांना मीच सरपंच म्हणून दिले आहे असे ते म्हणतात. त्या कामाबद्दल मिनानाथ काकडे यांना विचारले कि ,”इस्टिमेट व निधी किती मंजूर झाला याबद्दल मला योग्य माहिती नाही.असे सदस्य काकडे म्हणतात.”- (ढाकोरी,उपसरपंच शारदा अनंता शेंडे)
……………………………
“माझ्यावर लावलेले आरोप हे सर्व बिनबुडाचे आहे, त्यात काहीही तथ्य नाही.मला डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून असे आरोप लावले जात आहे “- (ढाकोरी, सरपंच अजय कवरासे)