Sunday, May 24, 2026
HomeCityसमाजसेवेच्या उपक्रमांनी दुमदुमला संजय खाडे यांचा वाढदिवस सोहळा...  

समाजसेवेच्या उपक्रमांनी दुमदुमला संजय खाडे यांचा वाढदिवस सोहळा…  

Ajay Kandewar,Wani : शेतकरी व कामगार नेते  Sanjay Khade यांचा वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमात साहित्य वाटप, रुग्णालयात फळवाटप तसेच नव्या व्यावसायिक कार्यालयाच्या उद्घाटनामुळे दिवसभर वणीत सामाजिक आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळाले.

सकाळच्या सत्रात शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरामध्ये १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाईफलाईन रक्तपेढी, नागपूर यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संजय खाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

दुपारच्या सत्रात वणीजवळील पळसोनी येथील बाजीराव वृद्धाश्रमात साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला. वृद्धांना कपडे, चप्पल तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना भावनिक आधार देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.संध्याकाळी ६ वाजता खासदार Pratibha Dhanorkar यांच्या हस्ते धनंजय खाडे संचालित “डीएसके कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स” या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नव्या व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सायंकाळी ७ वाजता शेतकरी मंदिर येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून संजय खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच संजय खाडे मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page