•पाटण पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले.
•ठाणेदार संदीप पाटील व पथक ॲक्शनमोड मध्ये…
अजय कंडेवार,वणी:- पाटण पोलीस स्टेशन हद्दीतील एक सराईत गुन्हेगारास केळापूर उपविभागीय न्याय दंडाधिकार्यांनी 2 वर्ष कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार केले. नवन उर्फ नवीन अशोक बद्दमवार (28 वर्षे) रा.नवीन दुर्भा, ता.झरीजामनी, जि.यवतमाळ असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.Perpetual Offender “Navan Baddamwar” for 2 years
नवन उर्फ नवीन अशोक बद्दमवार (28 वर्षे ) याच्या विरोधात 2019 पासून रेती तस्करी,शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ला, मारहाण,अट्रोसिटी असे 5 गुन्हे दाखल असून सदर गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.आरोपी नवन बद्दमवार यावर पोलिस स्टेशन पाटण व मुकुटबन येथून वारंवार कारवाई करून देखील त्यात कोणतीही सुधारणा न होता उलट त्याचे गुन्हे करणे वारंवार सुरूच होते . या सराईत गुन्हेगारावर अंकुश लावण्याकरिता पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदिप पाटील यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ.पवन बन्सोड यांच्याकडे सराईत गुन्हेगार नवन बद्दमवार यास जिल्ह्यातून तडीपार करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता.
सदर हाच अहवाल पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ.पवन बन्सोड यांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी केळापूर यांच्याकडे पाठविला होता.त्यावरून एस.डी.एम केळापूर यांनी सराईत गुन्हेगार नवन बद्दमवार यास यवतमाळ जिल्ह्यातुन 2 वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.त्यावरून दि.1 फेब्रु 24 रोजी पाटण पोलीस पथकाने नवन बद्दमवार यास 2 वर्षाकरिता तडीपारचे आदेश बजावून यवतमाळ जिल्हा हद्दीबाहेर सोडले.
सदरची कारवाई वरिष्ठांचा आदेशाने DYSP गणेश किंद्रे,LCB P.I आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार A.P.I संदिप पाटील, पोलीस अंमलदार अमित पोयाम, प्रदीप कवरासे, प्रशांत तलांडे, संदिप सोयाम यांनी केली.