Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsसचिन रासेकर यांची चिटणीसपदी निवड.....!

सचिन रासेकर यांची चिटणीसपदी निवड…..!

•राजकीय,सामाजिक व इतर सर्व समावेशक क्षेत्रात केलेल्या कार्याचे पावती मिळाली. •युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले .

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यांतील मोहदा गावातील कर्तव्यदक्ष उपसरपंच म्हणून ओळख असलेले सचिन रासेकर यांना माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी शिरपूर-शिंदोला लाठी-लालगुडा वणी ग्रामीण मंडळ चिटणीस म्हणून या पदावर नियुक्ती करण्यात आले.

सचिन रासेकर यांची वणी ग्रामीण मंडळ चिटणीस पदी निवड झाल्याने वणी तालुक्यातील विषेशतः युवकात नव चैतन्य निर्माण झाले आहे .येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अत्यंत चाणाक्षपणे माजी आमदार बोदकुरवार यांनी या खंबीर कार्यकारीणीची निवडी केल्या आहेत . मोहदा गावातील लाडके व मदतीला धावून जाणारे उपसरपंच रासेकर यांच्या निवडीचा फायदा तालुक्यात होणार आहे.

भाजपाने सचिन रासेकर यांना ज्या ज्या वेळी विविध कामांची व कार्यक्रमाची संधी दिली, त्या त्या वेळी त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. त्यात कार्यक्रम उपाययोजना असो की अन्य कोणतेही कार्य असो त्यांनी नेहमी सहभाग नोंदविला होता. सत्तेवर कोणीही असो त्यांच्या कडुन कौशल्याने व नम्रपणे गाव विकास कसा करता येईल याकडे त्यांचे विषेश लक्ष असते.

ही नियुक्ती राजकीय, सामाजिक व इतर सर्व समावेशक क्षेत्रात केलेल्या कार्याचे पावती असून भा.ज.पा. प्रती निष्ठा व समर्पनाची जाण ठेऊन मिळालेली संधी होय. या पदास योग्य न्याय देऊन पक्ष संघटना वाढीस अधिक बळकटी आणाल व पक्षाचे ध्येय, धोरण व कार्य यवतमाळ जिल्यातील वणी तालुका ग्रामिण भागात घरोघरी पोहोचविणार

@सचिन रासेकर (वणी ग्रामीण मंडळ चिटणीस)

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments