•ठेविदाराने दाखविला संस्थेवर विश्र्वास विरोधकांची उडाली भंबेरी
•वणीतील सुप्रसिद्ध बँकेला “स्थानिकच भोंगुर “लावीत असल्याचीही चर्चा , विरोधकांचे षडयंत्र लवकरच होणार उघड
अजय कंडेवार,वणी :– रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्था वणी बाबत दिनांक 28 जा. रोजी पासुन गैरव्यवहार, अपहार, व इतर बाबी दैनिकात आल्या. तसेच संस्थेबदल ठेविदार व सभासद यांचे मध्ये संभ्रम व गैरसमज पसरविण्यासाठी संस्थेमधुन काढुन टाकलेले अभिकर्ते व कर्मचारी यांचा कट असल्याचेही सूतोवाच रंगनाथ स्वामी संस्थेचे अध्यक्ष देवदास काळे यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहेच.
अनेक ठेविदार या संस्थेचे मागील अनेक वर्षापासुन सभासदही आहेत. त्यांचे व्यवहार चालु आहेत.मागील काही दिवसाअगोदरच काही ठेविदार बँकेत गेले असता असे निदर्शनास आले की ,संस्थेमध्ये जी गर्दी जमली होती. ती फक्त झालेल्या अफवेची शहानिशा करण्यासाठी होती व त्यामध्ये ठेविदार हे ही अफवा आहे.हे सिध्द झाल्यामुळे आपली ठेवि सुरक्षित आहे व आपल्या पुर्ववत ठेवुन संस्थेवरील विश्वास त्यांनी कायम ठेवला आहे.
तसेच संस्थेचा व्यवहार हा सुरक्षित सुरु असुन संस्था आजही ठेविदारांना गरज असल्यास त्यांच्या ठेवि परत करीत असुन आज रोजी संस्थेमधील गर्दी ओसरली आहे. व समस्त ठेविदारांचा संस्थेवरील विश्वास कायम असुन संभ्रम दूर झाला आहे. तरी संस्थेचे ठेविदार यांनी ठेवी संस्थेमध्ये सुरक्षित असुन प्रसारमाध्यमा मध्ये आलेली “ती” अफवा संस्थेला बदनाम करण्याकरीता व आकसापोटी असुन ती अफवा होती हे सिध्द झाले आहे. असेही म्हणायला काहीं हरकत नाही.
संस्थेचे जाहीर आव्हान………
“पतसंस्थेविरुद्ध जी अफवा पसरविण्यात आली. परंतु, त्या अफवेवर ठेवीदारांनी व सभासदांनी विश्वास ठेवू नये. आमच्या पतसंस्थेत ज्या ठेवी आहेत त्या ठेवी संपूर्णतः सुरक्षित आहेत. – अॅड. देविदास काळे,अध्यक्ष, श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी संस्था, वणी.