•सुदंराबाई मारोती रोगे यांचे दुःखद निधन
नागेश रायपुरे, मारेगाव:- सुदंराबाई मारोती रोगे रा.घोडदरा यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यूवेळी त्यांचे वय 90 वर्षाचे होते.
सुदंराबाई मारोती रोगे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दयाल भाऊ रोगे यांच्या माता होत्या.
आज 7 डिसेंबर रोजी ठीक 12 वाजता घोडदरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.यांचे मागे मुल, मुली,सून,नातवंड मोठा आप्त परिवार आहे.या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.