Ajay Kandewar,Wani:- वणी येथील एका १८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला मारहाण करण्यात आली व निर्जनस्थळी नेत एका विकृत बुध्दीचा अज्ञात व्यक्तीने त्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वणीत घडला आहे. गुरूवारी दुपारी 1 ते 2 चा दरम्यान शहरातील गांधीनगर परीसरातील तळ्याजवळील वणी गॅस गोडाऊनचा मागें ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रानी (काल्पनिक नाव ) वय १८ ही मुलगी वणी येथील गांधीनगर परीसरात एक वीटभट्टी आहे.त्या विट भट्टीकडे तुटलेल्या विटा जमा करण्याकरीता जात असतांनाच एका अज्ञाताची नजर त्या १८ वर्षीय मुलीवर पडली व तो अज्ञात आरोपी त्या मुलीचा मागे लागला. त्यातच त्यानें संधी साधून त्या चालत असलेल्या या पीडित मुलीला मागुन जोरात पकडलें व तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्या मुलीला तळ्याजवळील काटेरी झुडपात घेवुन गेला व त्या पीडित मुलीशी बळजबरीने शारीरीक संबंध तसेच अनैसर्गिक शारीरीक संबंध केले व तो तिला सोडून तेथून पसार झाला. ती पीडितेला असह्य वेदनेने वणी पोलीस स्टेशन गाठले व आपबिती पोलिसात तक्रार नोंदविली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांची चमू विविध ठिकाणीं रवाना झाली.
याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वणी पोलिस स्टेशनला कलम 64(1), 64(2) (1), 138,76,115 (2) भा.न्या.सं. या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. वणी पोलिसांनी त्या विकृताचा शोध घेत आहे.

