विदर्भ न्यूज ,वणी – दातृत्वाचे धनी व समाजकारणी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी दिनांक 23 मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचा समावेश आहे.
स. 8 वाजता रंगनाथ स्वामी मंदीर, वणी येथे पूजा व सत्कार समारंभ, स. 9 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी, 10.30 वाजता कायर, दुपारी 11 वाजता मुकुटबन, दु. 12.30 वाजता भीमनाळा,घोन्सा येथे दु 1 वाजता. वणी येथे दु. 2 वा. तर दु. 4 वाजता मारेगाव येथील शेतकरी मंदिर व संध्या 6 वाजता वणी येथील बाजोरिया लॉन येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.