•वणी शहरात “संजय खाडे “दातृत्वात अग्रेसर
अजय कंडेवार,वणी:- येथील रंगनाथ स्वामी फार्मर्स प्रोडुसर कंपनी लिमिटेड वणी तथा रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथे दि.16 डिसे.रोजी दोन स्वच्छता मशीन विशेष भेट देण्यात आले.
विदेही सद्गुरू जगन्नाथ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संजय खाडे यांच्यातर्फे दोन स्वच्छता मशीन भेट म्हणून देण्यात आल्या. या स्वच्छता मशीनने संपूर्ण वातावरण स्वच्छ आणखी स्वच्छ असणार यात तीळमात्र शंका नाही.असे संस्थानचे अध्यक्ष यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.याप्रसंगी भांदेवाडा संस्थानाचे अध्यक्ष बबन धानोरकर, पुरुषोत्तम आवारी, प्राचार्य शंकर वहाटे, नागोबाजी आवारी, माजी सरपंच गणेशपूर बोढे, रंगनाथस्वामी अर्बन निधीचे संचालक ईश्वर खाडे, धनंजय खाडे, रोशन ठाकरे आदी उपस्थित होते.