💠 27 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 24 पर्यंत असेल शिवमहापुराण
💠5 ते 7 लाख भाविक शिवपुराण ऐकण्यासाठी येणार.
💠अन्नदान आणि विविध सेवा देण्याचे आवाहन.
विदर्भ न्यूज डेस्क,वणी:- अवघ्या विदर्भाचे लक्ष केंद्रित करणारा तसेच परिसरात कुठेही न झालेला असा ऐतिहासिक असा काशी शिवमहापुराण वणी येथे पं. प्रदीप मिश्रा यांच्या संगीतमय सुश्राव्य वाणीतून होणार आहे.
वणीला नेहमीच संस्कृतीच माहेर म्हटल्या गेले आहे, वणीला तसा धार्मिक,सांस्कृतिक, वैचारिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, याला तसा मागील इतिहास पण आहेच, असाच एक ऐतिहासिक सोहळा वणीला राजा जैस्वाल यांच्या तर्फे तसेच यांच्या पुढाकारणे पार पडणार आहे. सध्या अखंड देशात तसेच देश विदेशात मोठे नाव लौकिक प्राप्त असलेले आणि प्रसार माध्यमाद्वारे ज्यांनी घरा घरात शिव महापुराण पोहोचविण्याचे कार्य केले आहे असे सिहोर निवासी पं. प्रदीप मिश्रा हे वणीला येणार आहे, या संदर्भात काल वणी च्या लाल पुलिया येथे सर्व कोळसा व्यापारी बांधवांची बैठक संप्पन झाली.
येणाऱ्या वर्षात 27 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 24 ला सात दिवसांचा शिव महापुराण चा पाठ होईल, यामध्ये नागपूर चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, गडचिरोली, आदिलाबाद,भंडारा, वर्धा सहित मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश परिसरसतील मोठ्या प्रमाणात शिवभक्त लाखोच्या संख्येने येणार असल्याने त्यासाठी काल लाल पुलिया येथे तेथील व्यवसायकांसोबत या विषयावर चर्चा आणि नियोजनाबद्दल एक बैठक बोलावण्यात आली होती, यात इतक्या भव्य आयोजणासाठी अनेक समित्या बनणार असून त्यावर कार्य आणि सेवा देऊ इच्छिणाऱ्या लोकांना या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी अश्या बैठका प्रत्येक क्षेत्रातील मंडळीसोबत आणखी घेण्यात येईल अशा सूचना ही येथे देण्यात आल्या.
यावेळी कोळसा व्यापारी राजा जैस्वाल, पम्मा सेठ,अनिल पाटील,निकेत गुप्ता, मुकेश साहू, शैलेश जैन,रमेश बाजोरिया,पवन ठाकूर, मनीष रुहटिया, गुड्डू बाजोरिया, बबलू अग्रवाल,पियुष गुप्ता पंकज लहरीया,राहुल कुचणकर, दास बाबू, श्याम लहरीया,सचिन ढोले, शैलेश ढोके सुधीर साळी, पांडे,सहित अन्य सदस्य उपस्थित होते.