•कोणताही ओवापोवा न करता गरजूंना धाऊनी येणारे “भाऊ” म्हणून शहरात विशेष ओळख.
सुरेंद्र इखारे,वणी – येथील श्रीराम लाठी आखाडा गणेशोत्सव मंडळाचे वतीने जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष इजहार शेख यांचा भावूक पद्धतीने सत्कार करण्यात आला आहे.
सामाजिक क्षेत्रात शांतमय रित्या काम करणारे व वेळ प्रसंगी कोणताही ओवापोवा न करता गरजूंना धाऊनी येणारे “भाऊ” म्हणून इजहार शेख यांची शहरात विशेष ओळख आहे तसेच प्रत्येकाला आपलं समजून घेणारे लोकप्रिय समाजसेवक इजहार शेख यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा श्रीराम लाठी आखाडाचे संचालक मंडळांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक रामजी दबडे ,संजय सोमशेट्टीवर , विलास चित्तलवर, रमेश डोंगरे, राजू सोमशेट्टीवर, अंकुश थोरात, कुणाल सोमशेट्टीवर, आदर्श गुरफुलें, सौरभ चित्तलवर, संतोष लजशेट्टीवार, पंकज कुलमेथे, साहिल देवळकर, संस्कार गुरुकुल, ओम पवार, राहुल ढवळे, युग मांडले, उपस्थित होते.