•शालेय विषयांशी सुसंगत मांडणी
अजय कंडेवार, वणी :- तालुक्यातील जि. प. व.प्राथमिक शाळा चिखलगाव दिनांक 31 डिसेंबरला शैक्षणिक साहित्य निर्मिती , प्रदर्शन व शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांना दैनंदिन अध्यापन प्रक्रियेसाठी सहाय्यक अशा शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शन नामदेवरावजी बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षक विद्यार्थ्यांनी फक्त प्रदर्शनपुरतेच या शैक्षणिक साहित्याचा वापर मर्यादित न ठेवता दैनंदिन अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत त्याचा उपयोग करावा. विद्यार्थ्यांना चार भितींच्या आत बंदिस्त न ठेवता त्यांना खुल्या वातावरणात फुलवू द्यावे, असाही या शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रदर्शन व शिक्षण परिषदेचा मुख्य हेतू होता.1 ते 5 चा शिक्षकांनी शालेय विषयांशी सुसंगत असे शैक्षणिक साहित्य अत्यंत सुंदर बनवले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कररावजी दुमोरे(उ.श्रे. मु (के.प्र.)प्रमुख पाहुणे म्हणून जेऊरकर ,रामगिरवार ,राजूरकर, बोढे हे उपस्थित होते. परीक्षक म्हणून संगीता मेश्राम व गादेवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक बोबडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश तालावार यांनी केले.
कार्क्प्स्क