•या गावात घडली ही हृदयद्रावक घटना.
माणिक कांबळे/मारेगाव :- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गोंडबुरांडा येथील एका विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.Do this act as soon as She come from the farm.This heartbreaking incident happened in this village.
रिना सुनिल मुसळे वय (20)असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.गोंडबुरांडा येथील सुनील मुसळे यांच्या सोबत रिनाचा विवाह सहा महिन्यापूर्वी झाला होता. तेव्हापासून ती आपल्या पती सोबत राहात असताना शेती कामात मदत करीत होती. मात्र तिने 20 मे रोजी सायंकाळी 6 वाजता चे सुमारास घरी कोणीही नसताना राहत्या घरात सागाच्या फाट्याला गळफास लावून आत्महत्या केली.
त्या नंतर काही वेळाने कुटुंबातील काही व्यक्ती शेतातून घरी परतल्यानंतर रीना घरामध्ये गळफास लावून असल्याचे निदर्शनास आले.या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बातमी लिहीपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे.