वणी : शेताचा धुरा फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात लोखंडी विड्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी वणी येथील एका आरोपीस एक वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.
किशोर काशिनाथ बोथले (४२, रा. भालर) हे शेतात कापसाची पेरणी करीत असताना, ‘तू माझ्या शेताचा धुरा का फोडला?’ असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यात आला. यावेळी लोखंडी विड्याने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद वणी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यावरून अन्वये भादंवि कलम ३२४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात निळकंठ उद्धव बोथले, बेबी निळकंठ बोथले व रोशन निळकंठ बोथले (सर्व रा. भालर) यांच्याविरुद्ध तपास करण्यात आला. यामध्ये सरकारी पक्षातर्फे अन्नलवार यांनी काम पाहिले. तपास अधिकारी दिगंबर किन्नाके होते, तर न्यायालयीन संतोष मडावी यांनीकेली.

